Question!
प्रश्न विचारणे ही शिक्षणाची सुरुवात असते, असे आम्ही मानतो. शिक्षणातील ‘गप्प बसा संस्कृती’ सोडून देऊन ‘प्रश्न विचारा!’ संस्कृती निर्माण करण्याचे काम आम्ही करतो आहोत.
Study with Resources!
Notemaking!
Explain and discuss!
Practice and Test!
कोणताही घटक दीर्घकाळ लक्षात राहण्यासाठी तीन पायऱ्या असतात:
१. समजून घेणे २. सराव करणे ३. स्वतःला तपासणे आणि पुन्हा पुन्हा सराव करणे!
योग्य होमवर्क आणि सततच्या सराव परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी होते!
Unlearn and Relearn!
आपण अगदी लहानपणी शिकतो- सूर्य उगवतो, मावळतो!
आणि मग थोडे मोठे झालो की सांगितले जाते – अरे काही उगवत नाही किंवा मावळत नाही.. तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यामुळे उगवतो – मावळतो असे भास होतात!
मग लहानपणी खोटं शिकवलं का? नाही! वाढत्या समजेनुसार, बौद्धिक कुवतीनुसार आपण जुन्या ज्ञानाला Update करतो, त्यात सुधारणा करतो! यालाच Unlearn, Relearn म्हटले जाते.
ही कौशल्ये आत्मसात करणे हे गणित विज्ञानाच्या शिक्षणासाठी फार महत्वाचे आहे!